मुंबई, दि. 1 : वडाळा येथील मुंबई
(पूर्व) प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे तीनचाकी वाहनांसाठी असलेली एमएच ०३ सीटी
ही वाहन नोंदणी क्रमांकाची मालिका संपत आहे. यामुळे तीनचाकी वाहनांसाठी एमएच ०३
डीसी ही नवीन मालिका ०१ ऑक्टोबर रोजी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती
प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ज्या वाहन
धारकांना आपल्या वाहनासाठी या मालिकेतून आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित
करावयाचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज पत्त्याचा पुरावा, छायाचित्र ओळखपत्र, पॅनकार्ड व पसंतीच्या
क्रमांकासाठीच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (पूर्व) यांचे नावे
काढलेल्या शुल्काच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या धनकर्षासह कार्यालयात दि. ०३ ऑक्टोबर
२०१८ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
एकाच नोंदणी
क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार
नियमीत फी व्यतिरिक्त सर्वात जास्त रक्कमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्यास नोंदणी
क्रमांक देण्यात येईल. तीनचाकी मालिकेतून इतर वाहनांसाठी तिप्पट शुल्क भरून आकर्षक
व पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करता येईल व अशा अर्जदारास शासकीय महसूल
वाढीसाठी प्राथम्य देण्यात येईल. आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्यासाठीची
कार्यपद्धती कार्यालयाच्या सूचना फलकावर लावलेली असून अनधिकृत व्यक्तीकडून होणारी
फसवणूक टाळण्यासाठी वाहनधारकांनी स्वतः कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात
आले आहे.
००००००
No comments:
Post a Comment