Tuesday, 30 October 2018

अमेरिकेतील फेसबुक, टीआयई संस्थेला राज्यातील बचतगटांच्या महिलांची भेट

राज्यातील बचतगट होणार आता 'हायटेक'
 मुंबईदि. ३० : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा अमेरिका दौऱ्याचा पहिला दिवस सर्वार्थाने सार्थकी ठरला. सॅनफ्रॅन्सिस्को येथे बचतगटांच्या महिलांसमवेत फेसबुक मुख्यालयव्हॉट्सअॅप प्रतिनिधी व टीआयई संस्थेला त्यांनी  भेट दिली. ग्रामीण बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी या दोन्ही माध्यमांचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सोबत काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
फेसबुक आणि व्हॉटसअॅप दोन्हीही समाजमाध्यमांनात्यांच्याकडील तंत्रज्ञान भारतातील आणि राज्यातील महिलांना देऊन त्यांना त्यांच्यातील कौशल्यांना जगासमोर मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकार बरोबर काम करण्याचे आवाहन मंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी केले. येथील अद्ययावत माहिती घेवून ग्रामीण भागातील बचतगट हायटेक झाल्याशिवाय राहणार नाहीतअसे त्या म्हणाल्या. राज्यातील युवकांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी फेसबुक आणि व्हॉटसअॅप एकत्र काम करणार आहेत. दोन्ही समाजमाध्यमांचे प्रतिनिधी डिसेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्राचा दौरा करणार असून दोघांनीही ही भागीदारी पुढे नेण्यासाठी बैठकीत सहमती दर्शविली.
याप्रसंगी  फेसबुकच्या प्रतिनिधी मीरा पटेलआरती सोमणब्रेंडा आणि कोलिनव्हाट्सॲप प्रतिनिधी बेन्सापलग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ताउमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला,फिक्कीचे प्रतिनिधी रुबाब सूद आणि बचत गटांच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
रोजगार निर्मितीसाठी 'टीआयईशी केली भागीदारीबाबत चर्चा
महाराष्ट्रातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता तीन वर्षासाठी संयुक्त भागीदारी करण्याबाबत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी सिलीकॉन व्हॅलीतील टीआयई (द इंडस् आन्त्रप्रेनुअरशिप) संस्थेच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली.
टीईआयच्या मदतीने महाराष्ट्रातील महिला व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता संयुक्त भागीदारी  करण्याबाबत मंत्री श्रीमती मुंडे यांनी त्यांच्या प्रतिनिधी समवेत चर्चा केली. राज्यात उमेद आणि माविमच्या माध्यमातून तसेच दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून होत असलेल्या रोजगार निर्मितीच्या कामाची त्यांनी माहिती दिली. बचतगट प्रतिनिधी राजश्री राडेविमल जाधवसंगीता गायकवाड यांनी त्यांचा गाव ते अमेरिका हा जीवनप्रवास कथन केला. त्यांच्या कार्याचे सर्वांनी कौतूक केले. टीआयईचे संस्थापक अध्यक्ष सुहास पाटील यांनी संस्थेच्या कामाचे सादरीकरण केले. यावेळी टीआयईचे कार्यकारी संचालक विजय मेननजय विश्वनाथनविश मिश्राराजू रेड्डीकरपगन नारायणनअनु जगदीश,मतिन सय्यदकरूणाकरणअजय पटवर्धन आणि फिक्कीचे प्रतिनिधी रुबाब सूद उपस्थित होते. यावेळी टीआयईच्या प्रतिनिधींना नोव्हेंबर महिन्यात  राज्यात येण्यासाठी निमंत्रित करण्यात आले.
वारली पेंटींगला मिळाला ७ हजार २१० रूपयांचा दर
यावेळी महाराष्ट्रातील बचतगटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तुंविषयी तेथील प्रतिनिधींनी मोठे कुतुहल व्यक्त करतानाच त्यातील काही वस्तुंची खरेदीही केली. तांब्याच्या एका बॉटलची 30 डॉलर्सना तर एका वारली पेंटिंगची 103 डॉलर्सना विक्री झाली. भारतीय रूपयात तांब्याच्या एका बॉटलला २ हजार १०० रूपये तर वारली पेंटींगला ७ हजार २१० रूपये मिळाले. १५ मिनिटात ३५ हजार ७०० रूपयांच्या सॅम्पल (नमुना) वस्तूंची विक्री झाल्याने बचतगटांच्या महिला प्रतिनिधीही यावेळी भारावून गेल्या.

००००

No comments:

Post a Comment