Thursday, 29 November 2018

आरक्षण विधेयक, 2018 विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर


मुंबईदि. 29 : महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांकरिता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक2018 आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रथम विधानसभेत आणि नंतर विधान परिषदेत हे विधेयक मांडले. विधानसभेत अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हे विधेयक वाचून दाखविले. आवाजी मतदानाने हे विधेयक संमत करण्यात आले.
विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटीलसदस्य सर्वश्री अजित पवारगणपतराव देशमुख यांनी पाठिंबा दर्शविला. तरविधान परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या विधेयकाला विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे सदस्य सर्वश्री भाई जगतापॲड. अनिल परबजयंत पाटीलविनायक मेटेजोगेंद्र कवाडेपशू संवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी पाठिंबा दर्शविला व मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले
 सर्व विरोधी पक्ष तसेच सभागृहाच्या सदस्यांनी विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आभार मानले.
***


No comments:

Post a Comment