मुंबई, दि. 29 : आदिवासी विकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळेमध्ये असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात येईल, असे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.
श्री. सवरा यांनी राज्यातील आश्रमशाळेतील स्वच्छता कर्मचारी व सुरक्षारक्षकांच्या प्रश्नावर बोलताना सांगितले, आदिवासी विकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणा-या आश्रमशाळेमध्ये स्वछता कर्मचारी हे पद मंजूर नाही. हे पद निर्माण करण्यात येईल तसेच त्यासाठी देण्यात येणाऱ्या परिरक्षण अनुदानात वाढ करण्यासंदर्भात व सुरक्षा रक्षकांच्या मानधन वाढीसंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल.
यावेळी सदस्य सर्वश्री डॉ. सुधीर तांबे, जोगेंद्र कवाडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
***
No comments:
Post a Comment