मुंबई, दि. 30 : स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेअंतर्गत राज्यातील रस्त्यामधील अपघातांमध्ये जखमी झालेल्या व तत्काळ वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असलेल्या व्यक्तीस अधिवासाच्या अटीशिवाय परिस्थिती स्थिर करण्यासाठी लागणाऱ्या 74 उपचारांच्या वैद्यकीय सेवा नजीकच्या अंगीकृत रुग्णालयामधून पहिल्या 72 तासांसाठी देण्यात येणार असल्याची महिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली.
या बाबतची लक्षवेधी सूचना सदस्य प्रसाद लाड यांनी मांडली होती. यावेळी डॉ. सावंत बोलत होते.
डॉ. सावंत म्हणाले, या वैद्यकीय सेवामध्ये आर्थोपेडिक, जनरल सर्जरी,न्युरो सर्जरी, नेत्र तज्ज्ञांच्या, कान नाक घसा, ट्रॉमा या तज्ज्ञ सेवांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत अपघात रुग्णास पूर्णपणे मोफत वैद्यकीय उपचारांचा लाभ देण्यात येईल. प्रति रुग्ण प्रति अपघात 30 हजार रुपयांपर्यंतचा खर्च या योजनेअंतर्गत अंगिकृत रुग्णालयास अदा करण्यात येईल. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्त व्यक्तीस सेवा देण्यासाठी उत्पन्नाची कोणतीही अट राहणार नाही. अपघाताच्या जागेपासून नजीकच्या अंगीकृत रुग्णालयात स्थलांतरीत करण्यासाठी राज्यात उपलब्ध असलेल्या 108 रुग्णवहिकेचा, ती उपलब्ध नसल्यास शासकीय रुग्णवाहिकेचा किंवा ती उपलब्ध नसल्यास खाजगी रुग्णहिकेचा वापर करण्याचे प्रस्तावित आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राबविणे, शासनाच्या विचाराधिन असून यावर कार्यवाही सुरु आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सुधीर तांबे यांनी सहभाग घेतला.
००००
No comments:
Post a Comment