मुंबई, दि. 30 : मंत्रालय इमारतीमध्ये दर्शनी भागावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र (पोट्रेट) व संविधानाचे प्रास्ताविक कायमस्वरुपी लावण्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधानपरिषदेत दिली.
या बाबतची लक्षवेधी सूचना सदस्य प्रकाश गजभिये यांनी मांडली होती. त्यावेळी श्री. येरावार बोलत होते.
यावेळी श्री. येरावार म्हणाले, सामाजिक न्याय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांनी मुख्य वास्तूशास्त्रज्ञ, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई व मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई यांच्या समवेत पाहणी करुन जागा निश्चित करावी व त्याअनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाची पुढीलआवश्यक ती कार्यवाही सुरु आहे. तसेच या संबंधित लवकरच कार्यवाही होईल.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हेमंत टकले यांनी सहभाग घेतला.
0 0 0
No comments:
Post a Comment