मुंबई, दि. 30 : संगणक परिचालकांना
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात सामावून घेण्याचा विषय हा धोरणात्मक विषय
असून याबाबत संबंधित सर्व विभागांची एकत्रित बैठक घेऊन लवकरच निर्णय घेणार
असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
या बाबतची लक्षवेधी सूचना विरोधी पक्षनेते
धनंजय मुंडे यांनी मांडली होती. या लक्षवेधीस उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, संगणक
परिचालकांमार्फत शासनाच्या अनेक योजना व सुविधा ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामस्थांना
पुरविण्यात येतात. संगणक परिचालकांच्या काही अडचणी आहेत. या अडचणी ग्रामविकास
विभागामार्फत सोडविण्यात येत आहेत. 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून संगणक
परिचालकांचे मानधन देण्यात येते. संगणक परिचालकांच्या मानधनाचा प्रश्न बऱ्याच
प्रमाणात सोडविण्यात आला असून काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीमूळे मानधनाचा विषय
प्रलंबित आहे. तोही सोडविण्यात येईल. तसेच संगणक परिचालकांच्या अन्य प्रलंबित
विषयाबाबतही निर्णय घेण्यात येईल.
०००
No comments:
Post a Comment