मुंबई, दि. 30 : जात पडताळणी समितीतील
अनियमिततेची सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करुन संबधितांवर कारवाई करणार
असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
परभणी जिल्हा जात पडताळणी समितीतील
अनियमिततेबाबत लक्षवेधी सूचना सदस्य अब्दुल्लाह खान दुर्राणी यांनी मांडली होती.
या लक्षवेधीस उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, जात पडताळणी
समितीतील अनियमिततेची सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेता याबाबत सचिव
दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी करुन चौकशीत तथ्य आढळल्यास संबधितांवर निलंबनाची
कारवाई करण्यात येईल. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली
जात पडताळणी समिती नियुक्त करण्याबाबत तपासणी करु.
या
लक्षवेधी चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य सर्वश्री जयंत पाटील, अनिल परब, शरद रणपिसे आदींनी सहभाग घेतला.
००००
No comments:
Post a Comment