मुंबई, दि. 29 : कोळशाची टंचाई लक्षात घेऊन मुंबईतील वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी अतिरिक्त कोळसा खरेदी केला होता. या अतिरिक्त कोळशाच्या किंमतीचा बोजा मुबईच्या वीज ग्राहकांवर पडणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.
यासंबधीची लक्षवेधी सूचना सदस्य श्री.अनिल परब यांनी मांडली होती. त्यावेळी श्री.बावनकुळे बोलत होते.
यावेळी श्री.बावनकुळे म्हणाले, कोळश्याचा तुटवडा असलेल्या काळात मुंबईतील ग्राहकांना अखंडीत वीज पुरवठा करण्याकरिता अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. यांच्या डहाणू येथील औष्णिक वीज प्रकल्पाकरिता सुमारे 20 कोटी किंमतीचा कोळसा आयात करण्यात आला, परंतु महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आयात केलेल्या कोळश्याची किंमत आंतरराष्ट्रीय कोळसा निर्देशकातील किंमतीप्रमाणे प्रतिबंधित केल्याने या अतिरिक्त कोळश्याच्या किंमतीचा बोजा मुंबईच्या ग्राहकांवर पडणार नाही.
००००
No comments:
Post a Comment