मुंबई, दि. 29 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिवडी क्षयरोग रुग्णालयातील परिचारीका, वार्ड बॉय यांच्या बेशिस्त, अनागोंदी कारभार व सोई-सुविधाबाबतची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले.
शिवडी मुंबई येथील क्षयरोग रुग्णालयातील कारभाराबाबत सदस्य श्रीमती विद्या चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगाने सभापतींनी उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य श्री.अनिल परब आणि श्रीमती मनिषा कायंदे आदींनी सहभाग घेतला.
००००
No comments:
Post a Comment