मुंबई, दि. 30 : राज्य विधानसभेच्या
उपाध्यक्षपदी विजय भास्करराव औटी यांची अविरोध
निवड झाल्याचे आज अध्यक्ष हरिभाऊ बागडे
यांनी जाहीर केले.
उपाध्यक्षपदासाठी विजय औटी यांची दोन
नामनिर्देशनपत्रे,
बच्चू कडू आणि हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रत्येकी एक नामनिर्देशनपत्र
अशी तीन उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. त्यापैकी आज श्री. कडू आणि
श्री. सपकाळ यांनी आपले नामनिर्देशनपत्र
विहित वेळेत मागे घेतले. त्यामुळे श्री. औटी यांची अविरोध निवड झाल्याचे अध्यक्ष
श्री. बागडे यांनी जाहीर केले.
निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्री. औटी यांचे अभिनंदन करुन त्यांना
उपाध्यक्षांच्या आसनापर्यंत घेऊन गेले. श्री. फडणवीस, श्री. विखे
पाटील यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंधारणमंत्री
राम शिंदे, सदस्य सर्वश्री अजित पवार, गणपतराव
देशमुख यांनी मनोगताद्वारे श्री. औटी यांचे अभिनंदन केले.
0000
No comments:
Post a Comment