Thursday, 29 November 2018

हाजी अली दर्ग्याचा सविस्तर विकास आराखडा पुढील बैठकीत सादर करावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सूचना



मुंबई, दि. २९ : हाजी अली दर्ग्याचे सौंदर्यीकरण करताना भाविक तसेच पर्यटकांना आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांचा सविस्तर प्रस्ताव पुढील बैठकीत सादर करावा, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या या बैठकीस आमदार सर्वश्री आशिष शेलारमंगलप्रभात लोढाअमीन पटेलअल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडेअल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेखमौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष हाजी हैदर आजम आदी उपस्थित होते
हाजी अली दर्ग्याचे काम करताना जी कामे तत्काळ हाती घेता येतील अशा कामांची यादी तयार करून ती सादर करावीत. तसेच ज्या कामांना सीआरझेड अंतर्गत विविध विभागांच्या परवानग्यांची आवश्यकता आहे त्याचीही स्वतंत्र यादी केली जावी असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणालेतातडीने जी कामे करता येतील त्यासाठी राज्य अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे बहृन्मुंबई महानगरपालिकेला शासन निधी उपलब्ध करून देईल. ही कामे करताना नाविन्यपूर्ण कल्पनांची अंमलबजावणी केली जावी त्यासाठी संबंधितांच्या सूचना मागवण्यात येऊन त्याचे सविस्तर सादरीकरण पुढील बैठकीत केले जावे. ही  कामे करताना  कोणकोणत्या विभागांची ना हरकत प्रमाणपत्रे लागतील याचाही अभ्यास केला जावा. यासाठीचे नियम अभ्यासले जावेत. दर्ग्याला देश-विदेशातून भाविकपर्यटक भेट देत असल्याने कामाचा दर्जा अतिउत्कृष्ट राहील याची काळजी घेतली जावी.
००००



No comments:

Post a Comment