मुंबई,दि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून शनिवार दि. 29 आणि सोमवार दि. 31 डिसेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॅार्टमध्ये साजरा होणारा पौर्णिमा महोत्सव, पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम, होम स्टे ही संकल्पना, पर्यटनाला चालना देण्यासाठी देश-विदेशातील अनेक कंपन्यांबरोबर करण्यात आलेले सामंजस्य करार, किनाऱ्यांवरील पर्यटन स्थळांना चालना देण्याची पर्यटन विभागाची योजना, पर्यटन वाढीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जनजागृती होण्यासाठीचे प्रयत्न, राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी चेतक महोत्सवांचे आयोजन, मुंबई ते गोवा क्रूझ सेवेची सुरुवात आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. काळे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.
०००
No comments:
Post a Comment