Friday, 28 December 2018

सातवा वेतन आयोग लागू केल्याबद्दल राजपत्रित अधिकारी महासंघाकडून मुख्यमंत्र्यांचा सत्कार



मुंबई, दि. २८ : राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे ७ वा वेतन आयोग लागू केल्याबद्दल राजपत्रित अधिकारी महासंघाने आनंद व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर्षा निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी संघाचे संस्थापक सल्लागार ग. दि. कुलथेअध्यक्ष विनोद देसाईसरचिटणीस समीर भाटकरउपाध्यक्ष डॉ. एस. एम.पाटीलप्रदीप शर्मासुदाम तावरेविष्णू पाटीलउदय चव्हाण आदी उपस्थित होते
यावेळी श्री. कुलथे यांनी निवृत्तीचे वय ६० वर्ष आणि पाच दिवसांचा आठवडा याबाबतही त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावरही लवकरच निर्णय घेतला जाईलअसे आश्वस्त केले.
0 0 0

No comments:

Post a Comment