नागपूर, दि. 01 : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने नवीन दुचाकी वाहनांकरिता MH-31 FK ही मालिका सुरु करण्यात आली आहे. या मालिकेंतर्गत वाहनांकरिता पसंती क्रमांक घेणे व त्यास आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
सुविधेचा लाभ घेत वाहनांकरिता पसंती क्रमांक आरक्षित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (शहर) यास संपर्क साधण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
*****
No comments:
Post a Comment