मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्याच्या कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकांच्या सोईसाठी महालेखापाल (ले.व.ह) 1, महाराष्ट्र, मुंबई यांच्या कार्यालयाने ‘Pull SMS’ सेवा सुरु केली आहे. भविष्य निर्वाह निधी खात्याची वर्तमान स्थिती (Current Balance) व निवृत्ती वेतनाच्या मंजुरीची वर्तमान स्थिती (Current Status) ची माहिती नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर उपलब्ध होईल. लघुसंदेश (sms) करण्याची पद्धत आणि क्रमांकाची माहिती कार्यालयाच्या www.agmaha.cag.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र राज्याच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक कार्यालयाच्या संकेत स्थळावर नोंदणीकृत करावेत. जे कर्मचारी, त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक टपालाद्वारे नोंदणी (Ragister) करु इच्छितात. त्यांनी तो आहरण व संवितरण अधिकारी कार्यालयाद्वारे पुढील पत्त्यावर पाठवावा. वरिष्ठ सेवा अधिकारी/निधी विविध, महालेखापाल(ले.व.ह) 1, महाराष्ट्र, प्रतिष्ठा भवन, 101, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई-400020.
महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन प्रदानाच्या व भ.नि.नि अंतिम प्रदानानाच्या आदेशाची प्रत ऑनलाईन प्रणाली द्वारा डाउनलोड करता येईल. तसेच. भ.नि.नि. व निवृत्ती वेतनाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी समर्पित “grievances.mh1.ae@cag.gov.in ” या ईमेल आयडीची निर्मिती केली आहे, असे महालेखापाल अनंता किशोर बेहरा, यांनी कळविले आहे.
निवृत्त होणाऱ्या कर्मचार्ऱ्यांचे निवृत्ती वेतन व भ.नि.नि. चे अंतिम प्रदान प्रकरण आहरण व संवितरण अधिकार्ऱ्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या सहा महिने आधी, संबंधितांचा भ्रमणध्वनी क्रमांक अर्जावर नमूद करुन या कार्यालयास पाठविण्याची गरज आहे असे ही महालेखापाल श्री बेहरा, यांनी कळविले आहे.
००००
No comments:
Post a Comment