Saturday, 1 December 2018

कोकणातील कुणबी समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यवाही करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबईदि. 1 :  रायगडठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कुणबी समाजाच्या प्रलंबित विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.
कोकणातील कुणबी समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळासमवेत बैठक झाली. बैठकीस आदिवासी विकासमंत्री विष्णू सवराखासदार कपिल पाटीलवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यु.पी.एस. मदानमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,  विजाभजइमाव विमाप्र विभागाचे सचिव जे. पी. गुप्ताविधी व न्याय विभागाचे सचिव राजेश लड्डा,  कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटीलरायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
यावेळी शिष्टमंडळातील आमदार अनिकेत तटकरेसुनील तटकरेधैर्यशील पाटीलकिशन कथोरेकुणबी समाज संघटनेचे शंकरराव म्हसकरविनय नातू तसेच पदाधिकारीसदस्य यांनी विविध प्रश्नांबाबत मांडणी केली.
त्यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विविध निर्देश दिले. या तीन जिल्ह्यातील बेदखल कुळांबाबतची प्रकरणे निकाली काढण्यासाठी विभागीय आयुक्त आणि तीनही जिल्हाधिकारी यांनी ग्रामीण तसेच नागरी क्षेत्रातील जमिनींबाबत अभ्यास अहवाल द्यावा. समाजाची तीनही जिल्ह्यात वसतिगृह उभारणीसाठी जमिनींचा शोध घ्यावात्यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन- प्रशिक्षणजात पडताळणी व वैधता प्रमाणपत्रासाठीची प्रक्रिया सुलभीकरणखासगी-वने संज्ञेतील जमिनी मुक्त करणेकुणबी उच्चाधिकार समितीच्या काही शिफारशी तसेच स्थापन उपकंपनीला निधी उपलब्ध करून देणेयांसह चर्चेतील विविध मुद्यांवरील निर्देशांचा समावेश होता.
                                                                       ००००

No comments:

Post a Comment