नागपूर, दि. 28 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नागपूर (ग्रामीण) साठी लाभार्थ्यांना साखर वितरित करण्यासाठी 2033 क्विं. साखरेचे नियतन माहे डिसेंबर 2018 तसेच जानेवारी व फेब्रुवारी 2019 या तिमाही करिता प्राप्त झाले आहे. तालुकानिहाय रास्त भाव दुकानदारामार्फत फक्त अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रति कुटुंब विक्रीचा दर रुपये 20 प्रति किलो याप्रमाणे वितरण करण्यात येणार आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनी केले आहे.
***
No comments:
Post a Comment