Friday, 28 December 2018

कापूस पिकावरील बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सूचना

नागपूर, दि. 28 : नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात खरीप हंगाम 2017 मध्ये कापूस पिकावरील बोंड अळीमुळे नुकसान  झाले आहे. अशा नुकसानीची मदत वितरण करण्यासाठी बँक खाते प्राप्त होण्यास शिल्लक बाधित खातेदारांची यादी तलाठी साजा निहाय व गावनिहाय तयार करण्यात आली आहे. यादी संबंधित ग्राम पंचायत, तलाठी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. यादीतील बहुतांश शेतकऱ्यांचे बँक खाते तलाठी यांच्याकडून प्राप्त करुन संबंधित बाधित शतेकऱ्यांचे बँक खात्यावर यापूर्वीच मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे. परंतु काही खातेदारांनी दीर्घ कालावधी लोटूनही व संबंधित तलाठ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधूनही त्यांनी अद्यापही आपले बँक खाते तलाठी यांच्याकडे जमा केले नाही. त्यामुळे अशा खातेदारांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा करता येत नाही, असे तहसीलदार उमरेड यांनी कळविले आहे.
अशा श्ल्लिक बाधित खातेदारांची यादी तलाठी साजा निहाय व गावनिहाय तयार करण्यात आली असून अशी यादी संबंधित ग्राम पंचायत, तलाठी कार्यालय तसेच तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
संबंधित बाधित खातेदारांनी आपल्या नावाची खात्री करुन ही जाहीर सूचना प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसांचे आत संबंधित तलाठी/ संबंधित सर्कलचे राजस्व मंडळ अधिकारी यांच्याकडे बँक खाते क्रमांक व शाखेचे नाव पत्त्यासह माहिती जमा करावी. विहित मुदतीत संबंधित खातेदारांनी तलाठी/ संबंधित सर्कलचे राजस्व मंडळ अधिकारी यांच्याकडे बँक खात्याची माहिती जमा न केल्यास त्यांना खरीप हंगाम 2017 मध्ये कापूस पिकारील बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या नुकसानीचे शासकीय मदतीची गरज नाही, असे गृहित धरुन संबंधित बाधित शेतकऱ्यांची रक्कम शासन खजिना दाखल करण्यात येईल,  याची नोंद संबंधित बाधित शेतकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार उमरेड यांनी केले आहे.
बाधित शेतकऱ्यांच्या त्यानंतर आलेल्या कोणत्याही तक्रारी/ आक्षेपाचा विचार केला जाणार नाही असेही तहसीलदार उमरेड यांनी कळविले आहे.
*****

No comments:

Post a Comment