Saturday, 1 December 2018

जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग मतदार नोंदणी कार्यक्रम उद्या

* राज्य निवडणूक आयोगाचा उपक्रम
नागपूर, दि. 01: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने ‘सुलभ निवडणुका’ या ब्रीदवाक्यासह अपंग नवमतदारांचा नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. ‘जागतिक अपंग दिनी’ सोमवार, दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बचत भवन येथे अपंग मतदार व नवीन नोंदणी झालेल्या मतदारांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे. ‘जागतिक अपंग दिना’चे औचित्य साधून विधानसभा मतदार संघ, मतदान केंद्रस्तरावर मतदान नोंदणी अधिकारी व बिएलओच्या मदतीने अपंग मतदारांची नाव नोंदणी करण्यात येऊन अपंग दिन साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास जास्तीत जास्त अपंग बांधवांनी उपस्थित राहून नाव नोंदणी करण्याचे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
                                                                *****

No comments:

Post a Comment