Saturday, 1 December 2018

जिल्ह्यात कलम 33(1), 36, 37 (1)(3) लागू


नागपूर, दि.01 : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्तालय नागपूर शहर क्षेत्रात सह पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम1951 चे कलम 33 (1) कलम 36 तसेच 37 (1) व (3)  लागू करण्यात आला आहे.

कलमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी स्फोटक पदार्थ बाळगणे, वाद्यांचा लोकास अडथळा निर्माण होईल या पद्धतीने वापर करता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी जमावामुळे कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही तसेच सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्ती विना परवाना एकत्र आल्याने कायद्यास बाधा निर्माण होणार नाही,यांची संबंधितांनी काळजी घ्यावी.
हा आदेश दि. 15 डिसेंबर 2018 च्या मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहणार असून कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायेदशीर कारवाई करण्यात येईल, असे सह पोलीस आयुक्त रविंद्र कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*****


  

No comments:

Post a Comment