नागपूर, दि. 29 : 46व्या आशियाई स्कुल फुटबॉल चॅम्पीयनशीपमध्ये पहिला
आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्याचा मान मिळविणाऱ्या नागपूर येथील भूवन जरपीटचा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी सत्कार केला.
केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालय अंतर्गत स्कुल फेडरेशन ऑफ इंडियाच्या
वतीने आग्रा येथे नुकत्याच 46व्या आशियाई स्कुल फुटबॉल चॅम्पीयनशीपचे आयोजन
करण्यात आले. यामध्ये आशियातील दहा देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. आग्रा
येथे झालेल्या स्पर्धेत भारताच्या फुटबॉल चमूने गुणतालिकेत चौथे स्थान मिळविले.
आशियाई स्कुल फुटबॉल स्पर्धेत भारताच्या वतीने खेळणाऱ्या चमूत नागपूर येथील
फुटबॉलपटू भूवन जरपीटला स्थान मिळाले. त्यासोबतच त्याला पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू
होण्याचा सन्मान देखील प्राप्त झाला. त्याच्या या कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी यांनी भूवनचे कौतुक करीत सत्कार केला.
यावेळी भूवनचे वडील सत्यनारायण जरपीट, आई वेणी जरपीट, बहिण भव्या जरपीट,
श्रीकांत घुई आदी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment