मुंबई, दि. 31 :
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
राधेश्याम मोपलवार यांची ‘दर्जेदार रस्ते, सुरक्षित प्रवास’ या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात
आली आहे. ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' मध्ये दूरदर्शनच्या सह्याद्री
वाहिनीवर शुक्रवार दि. १ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारण
होणार आहे. तसेच राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि. 1 आणि
शनिवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक
राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास
महामंडळाचे उपक्रम,
मुंबई- पुणे द्रुतगती मार्ग, वांद्रे- वरळी
सागरी सेतू, मुंबई - ठाण्यातील 36 उड्डाणपूल, राज्यातील 10 शहरांमध्ये एकात्मिक रस्ते विकास योजना असे एकूण पुर्ण
केलेले प्रकल्प, नागपूर व मुंबईला जोडणारा ७०१ लांबींचा महाराष्ट्र
समृध्दी महामार्ग व इतर मेगा प्रकल्प या विषयी सविस्तर माहिती श्री. मोपलवार यांनी
'जय
महाराष्ट्र' व 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment