.वि.364
मुंबई, दि. 1 : शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाने 2019 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी तरतूद केली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे देशातील सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. तसेच शेतकरी, कामगार, महिला यांना केंद्र बिंदू ठेवून देशाच्या विकासासाठी सर्व समावेशक असा अर्थसंकल्प सादर केला आहे, अशी प्रतिक्रीया देऊन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2019 चे स्वागत केले आहे.
या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना केंद्र बिंदू ठेवून 22 पिकांचा किमान हमीभाव वाढवला आहे. तसेच आयकर मर्यादा 2.30 लाखाहून वाढवून 5 लाखांपर्यत करमुक्त करुन सर्व सामान्य आयकर खातेधारकांना दिलासा मोठा दिलासा दिला आहे. तर 21 हजारपर्यंत पगार असलेल्या असंघटीत कामगारांना 7 हजार बोनस सुद्धा या अर्थसंकल्पात नमूद केले आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागणाऱ्या शेतकऱ्यांना 2 टक्के व्याजाची सवलत तर वेळेत कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त 3 टक्यांचा लाभ देण्याचा निर्णयही या अर्थसंकल्पात देण्यात आला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार. तसेच 1 लाख गावे डिजिटल करण्याचा निर्णय हा ग्रामविकासाला चालना देणारा आहे, असे सांगून लोककल्याणकारी अर्थसंकल्पाचे श्री. देशमुख यांनी स्वागत केले.
००००
No comments:
Post a Comment