वृ.वि.365
मुंबई, दि. 1 : केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर करताना प्रत्येक नागरिकाला विकासाच्या प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. छोटे शेतकरी, कामगार वर्ग, मध्यमवर्गीय नोकरदार करदाते, आदी सर्व घटकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. तसेच आयकरातील सवलत अडीच लाखावरुन ५ लाखापर्यंत वाढविण्यात आल्यामुळे मध्यमवर्गीय नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. असंघटित कामगारांसाठी ३ हजार रुपये पेन्शन, शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचे अर्थसहाय्य, मत्स्यपालनासाठी स्वतंत्र आयोग, पशुपालनासाठी किसान क्रेडिट कार्ड, गायींसाठी राष्ट्रीय कामधेनू योजना, महिलांना २६ आठवड्याची प्रसुती रजा,अंगणवाडी सेविकांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या रक्कमेत ५० टक्के वाढ इत्यादी अर्थसंकल्पातील तरतूदींमुळे सर्वसामान्य घटकांना दिलासा मिळाला आहे.
००००
No comments:
Post a Comment