Wednesday, 27 February 2019

नागपूर जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्टया जाहीर



नागपूर, दि. 27 :  नागपूर जिल्ह्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सन 2019 साठी अक्षयतृतीयानिमित्त मंगळवार, दिनांक  7 मे 2019, महालक्ष्मी पूजनानिमित्त शुक्रवार, दिनांक 6 सप्टेंबर 2019 तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सोमवार, दिनांक 14 ऑक्टोबर 2019 रोजी  स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.
वर निर्दिष्ट स्थानिक सुट्टयांची सर्व संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे विभागीय आयुक्त यांनी कळवलिे आहे. तसेच या सुट्या नागपूर जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि अधिकोष (बँक)यांना लागू होणार नसल्याचेही कळविण्यात आले आहे.
****


No comments:

Post a Comment