Wednesday, 27 February 2019

जिल्हा लोकशाही दिन येत्या मंगळवारी


नागपूर, दि. 27 : जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी साजरा करण्यात येतो. परंतु सोमवार दिनांक 4 मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे यावेळी लोकशाही दिन सोमवार ऐवजी मंगळवार दिनांक 5 मार्च 2019 रोजी दुपारी 1 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला असून तक्रारकर्त्यांनी तालुकास्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत, लोकशाही  दिनाच्या टोकनाची प्रत तसेच विहीत नमुन्यातील अर्ज या सर्व प्रतींचे स्वतंत्र दोन संच  घेऊन दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत स्वत: उपस्थित रहावे. तक्रारकर्त्यांनी शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या तक्रारी  दिनांक 5 मार्च रोजी आयोजित जिल्हा लोकशाही दिनात दुपारी 12.30 ते 1 वाजेपर्यंत सादर कराव्यात.
न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपील्स प्रकरणे, न्यायालयीन प्रक्रियेचा अंतर्भाव असलेली प्रकरणे, सेवाविषयक व नोकरीविषयक व आस्थापना विषयक प्रकरणे, कार्यालय प्रमुखांनी अंतिम उत्तरे दिलेले प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
*****

No comments:

Post a Comment