नागपूर, दि. 27 : उन्हाळ्यात उष्णता प्रचंड
वेगाने वाढत असून, उष्माघाताचे बळी पडत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस वाढत असलेली
उष्णता आणि त्याचे बळी थांबवणे गरजेचे असून, उष्णतावाढ रोखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी
आहे. त्यामुळे त्याच्या अंमलबजावणीसाठी शासन तत्पर असल्याचे प्रतिपादन आपत्ती
व्यवस्थापन विभागाचे संचालक अरुण उन्हाळे यांनी केले.
राष्ट्रीय
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय
तसेच महानगर पालिका नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज नागपूरमध्ये उष्णता लाट
नियंत्रित करण्याची तयारी, शमन आणि व्यवस्थापन यासाठी
दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय कार्यशाळेचे
उद्घाटन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन संचालक अरुण उन्हाळे यांच्या हस्ते झाले, त्या
प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी
व्यासपीठावर एनडीएमएचे संयुक्त सचिव
डॉ. व्ही. तिरुपुगुज, सदस्य डॉ. डी. एन. शर्मा, लेफ्टिनेंट जनरल एन. एन. मारवा (निवृत्त), डॉ.
दिलीप मावलणकर यावेळी उपस्थित होते. लक्ष्मीनगर येथील हॉटेल अशोक येथे दोन दिवशीय कार्यशाळा
आयोजित केली होती.
एनडीएमएच्या
उष्णता लाटेवरील राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार विशिष्ट हिट अॅक्शन प्लॅन
तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करण्याची गरज असा कार्यशाळेचा हेतू असल्याचे सांगताना
संचालक अरुण उन्हाळे म्हणाले की, या कार्यशाळेत उन्हाळ्यातील हंगामासाठी आणि
भविष्यातील उदयोन्मुख समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यावर चर्चा होईल, असा अशावाद व्यक्त केला.
स्थानिक समस्यांसाठी
स्थानिक उपाय शोधून काढण्यासाठी कायमस्वरुपी उपायांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज
यावर एनडीएमएचे सदस्य लेफ्टिनेंट जनरल एन. एन. मारवा (निवृत्त) यांनी भर दिला. तर
कार्यशाळेसाठी अजेंडा तयार करताना, आम्ही केवळ उष्णतामान
मृत्यूच्या दिशेने आणि उष्णता-संबंधी आजारांकडे लक्ष न देण्याचा प्रयत्न केला
पाहिजे, तर उष्णताग्रस्त जोखीम कमी
करणे देखील आवश्यक आहे.
वातावरणातील बदलामुळे तापमान वाढते तसेच उष्णतेच्या लाटा
वारंवारिता व तीव्रता वाढते. इंटर-सरकारी पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी)
द्वारा नुकत्याच केलेल्या एका अहवालात असे दिसून आले आहे की भारतीय
उपमहाद्वीपमध्ये जागतिक तापमानवाढीचा प्रभाव लवकर आणि अंदाजापेक्षा कठिण झाला
असल्याचे असल्याचे एनडीएमएचे संयुक्त सचिव डॉ. व्ही. तिरुपुगुज यांनी यावेळी
सांगितले.
हवामान
बदल आणि उष्णता वेगाचे जोखीम कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले. सस्टेनेबल
डेव्हलपमेंट गोल्स (एसडीजी) साध्य करण्याच्या विस्तृत जागतिक संदर्भात भारताच्या
हीट वेव्ह मॅनेजमेंट प्लॅनिंगच्या योजनेची चर्चा यावेळी करण्यात आली.
भारतीय
हवामान विज्ञान विभागाने (आयएमडी) या वर्षाच्या सामान्य उन्हाळ्याच्या तापमानाची
शक्यता वर्तविली आहे. जसजसे तापमान वाढते, त्यामुळे मजबूत आणि जास्त
उष्णता लाट निर्माण होतात, ते तयार केले जाईल. तसेच, वेळेवर आणि अचूक सूचना आणि असुरक्षित लोकसंख्येच्या
प्रसाराने उष्णता संबंधित जोखमींचे प्रभावी नुकसान सुनिश्चित होईल. प्रारंभिक
सतर्कता, पूर्वानुमान आणि सज्जता या
सत्रात या विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच उष्णतेवरनियंत्रण मिळविण्यासाठी योजना
तयार करण्यास आणि अंमलबजावणी करण्यास मदत होईल. सूक्ष्म नियोजन, सज्जता आणि वेळेवर उपचार यावर भर देणे
आवश्श्क असल्याचे त्यांनी सांगितले.
एनडीएमएचे
सदस्य व वरिष्ठ अधिकारी या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment