Wednesday, 27 February 2019

श्रीकांत फडके नवे अतिरिक्त जिल्हाधिकारी


नागपूर, दि. 27 :  विभागीय आयुक्त कार्यालयातील पुनर्वसन उपायुक्त श्रीकांत शरद फडके यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदावर बदली झाली असून त्यांनी नव्या पदाची सुत्रे स्वीकारली आहे. श्री. फडके यांच्याकडे लोकसभा निवडणुकीच्या रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी ही जबाबदारी राहणार आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके हे यापूर्वी नागपूर विभागाचे पुनर्वसन आयुक्त या पदावर कार्यरत होते. लोकसेवा आयोगातर्फे 1990 मध्ये अमरावतीचे तहसिलदार म्हणून निवड झाली होती. त्यांनी अमरावती विभागात उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले असून अमरावती जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी निवडणूक आदी पदावर काम केले आहे. प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेले श्रीकांत फडके यांचेकडे अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे.
****

No comments:

Post a Comment