Friday, 1 February 2019

कामगार आणि माजी सैनिकांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद -- संभाजी पाटील-निलंगेकर

वृ.वि.367                                                                                 
                                                                                                 दि. 1 फेब्रुवारी2019


मुंबई दि. 1 : केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला असून या अर्थसंकल्पात कामगार आणि माजी सैनिकांच्या कल्याणासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे याचा आनंद असल्याचा कामगार आणि माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांगितले.
असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सुरक्षितता नसल्याने त्यांना देण्यात येणाऱ्या निवृत्ती वेतनामुळे एक आर्थिक सुरक्षा या कामगार वर्गाला मिळणार आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना फायदा होणार आहे. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत कामगार वर्गाला बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ग्रॅच्युइटीची मर्यादाही १० लाखांवरून ३० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या सर्व योजनांमुळे कामगार वर्गाला या अर्थसंकल्पात न्याय मिळाला आहे.
संरक्षण खात्यासाठी  लाख कोटींची तरतूद
संरक्षण खात्याच्या निधीमध्ये  वाढ करण्यात आली असून यंदा संरक्षण खात्याचा एकूण खर्च  लाख कोटी रुपये असणार आहे. विविध मिसाइल्सनिवृत्ती वेतनमासिक पगार या सर्वांसाठी देण्यात आलेल्या निधीत वाढ करण्यात आली आहे.

००००

No comments:

Post a Comment