Friday, 1 February 2019

महाराष्ट्रातील २५ रुसा प्रकल्पांचे रविवारी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते डिजीटल लाँचिंग

वृ.वि.366                                                                                 
                                                                                                 दि. 1 फेब्रुवारी2019

मुंबईदि. १ : प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान २.० (रुसा) या कार्यक्रमांतर्गत रविवारी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.४५ वाजता व्हिडीओ कॉन्फरंसींगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील २५ रुसा अंतर्गत प्रकल्पांच्या डिजीटल लाँचींगचा कार्यक्रम होणार आहे. मुंबईत चर्चगेट येथील सेंट झेवियर्स येथे होणाऱ्या २ रुसा प्रकल्पांच्या डिजीटल लाँचिगच्या कार्यक्रमप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षणमत्री  विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.
रुसा अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील चिखली येथील नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजचा कोनशिला अनावरण समारंभ त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजचा अनावरण समारंभ डिजीटल लाँचिंगच्यामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे रुसा अंतर्गत महाराष्ट्राला स्वायतत्ता मिळालेल्या खालील महाविद्यालयांचे डिजीटल लाँचिग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते होणार आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयमहाराष्ट्र सरकार आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिडीओ कॉन्फरंसींगच्या माध्यमातून डिजीटल लाँचिंगचा कार्यक्रम होणार आहे. रुसाच्या ज्या २२ महाविद्यालयांना स्वायतत्ता मिळाली आहेत्या महाविद्यालयांमध्ये जय हिंद कॉलेजमुंबईसेंट झेवियर्स कॉलेज मुंबईरामनरीन रुईया कॉलेज मुंबईमिठीबाई कॉलेज ऑफ आर्टसचौहान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सए जी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स मुंबई,डॉ. भानूबेन महेंद्र नानावटी ऑफ होम सायन्स मुंबईहंसराज जीवनदास कॉलेज ऑफ एज्युकेशन मुंबईएसआयईएस कॉलेज ऑफ आर्टससायन्स ॲण्ड कॉमर्स मुंबईसोफीया कॉलेज ऑफ वूमन मुंबईचिकित्सक समूहास सन सीताराम ॲण्ड लेडी शांताबाई पाटकर कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड सायन्स ॲण्ड व्ही पी वर्दे कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स  मुंबईगुरु नानक खालसा कॉलेज ऑफ आर्टस सायन्स ॲण्ड कॉमर्स मुंबईबी. के. बिर्ला कॉलेज ऑफ आर्टससायन्स ॲण्ड कॉमर्सठाणेरयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजरायगडचांगू काना ठाकूर आर्टसकॉमर्स ॲण्ड सायन्सरायगडसिमबॉयसेस कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड कॉमर्ससेनापती बापटपुणेसर परशुरामभाऊ कॉलेजपुणे,  सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीपुणेछत्रपती शिवाजी कॉलेजसातारा,तुलजाराम चतुरचंद कॉलेज ऑफ आर्टससायन्स ॲण्ड कॉमर्स बारामतीपुणेयशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससातारासदगुरु गाडगे महाराज कॉलेजकराडसाताराधनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स साताराकर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय,पंढरपूरसोलापूरछत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन ॲण्ड रिसर्चकोल्हापूर या महाविद्यालयांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले विद्यापीठपुणे येथील प्रकल्पाचे डिजीटल लाँचिंग होणार आहे.
शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी महाविद्यालयांना जागतिकीकरणाच्या वेगाबरोबर रोजगारभिमुख नवनवीन अभ्यासक्रम संशोधन व विकास व नवोपक्रम राबविण्यासाठी महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायतत्ता देण्याचे शासनाचे धोरण आहे. सदर संकल्पनेचा पुढील टप्पा म्हणून स्वायतत्ता प्रदान केलेल्या महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायतत्ता योग्यप्रकारे अंमलात आणण्यासाठी भौतिक संरचना व पायाभूत सुविधाकरिता राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यात येते.
००००

No comments:

Post a Comment