नागपूर, दि. 29 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार, दिनांक 1 मे 2019 रोजी सकाळी 8.00 वाजता कस्तुरचंद पार्क येथे राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी राष्ट्रध्वज मानवंदनेसाठी राष्ट्रीय पोशाखात उपस्थित राहावे. तसेच डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment