मुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘‘स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेची तयारी’’या विषयावर स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ प्रा. आनंद मापुस्कर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि.१६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
स्टाफ सिलेक्शनच्या पेपरचे स्वरूप, बँकिंग परीक्षेची तयारी, परीक्षांची जाहिरात कोठे पाहायला मिळते, एस. एस. बी, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षांद्वारे भरली जाणारी पदे, स्टाफ सिलेक्शनद्वारे भरली जाणारी पदे आदी विषयांची माहिती श्री. मापुस्कर यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात दिली आहे.
0000
No comments:
Post a Comment