नागपूर, दि.10 - निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रि क निवडणुकीतील रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघात समाज माध्यम (सोशल मिडीया) वरील उमेदवारांच्या प्रचार व प्रसारावर बंदी घालण्यात आली आहे.
उद्या गुरूवारी 11 एप्रिल 2019 रोजी नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. मतदान दिवसाच्या ४८ तासापुर्वीच उमेदवारांच्या सर्व प्रकारच्या प्रचार व प्रसारावर निवडणूक आयोगाकडून बंदी घालण्यात आली आहे. समाज माध्यम (सोशल मिडीया) वर उमेदवार किंवा पक्षाचा प्रचार प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाप्रकारचा प्रचार व प्रसार आढळून आल्यास लोकप्रतिनिधी कायदा कलम १२६ (१) (बी) नुसार संबंधीत राजकीय पक्ष, त्यांचे समर्थक व अशा व्यक्तीविरूध्द कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment