* मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत
नागपूर, दि. 10 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता उद्या 11 एप्रिल रोजी लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 अन्वये अत्यावश्यक सेवा देणारे दुकाने व आस्थापना वगळून सर्व आस्थापना सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळात बंद ठेवण्यात येतील. त्या दिवशी बंद राहिलेले दुकाने, आस्थापनामधील कर्मचाऱ्यांच्या पगाराची कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही, असे अपर कामगार आयुक्त यांनी कळविले आहे.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित मनपा आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. तरी संबंधित नियोक्त्यांनी, मालकांनी, व्यवस्थापकांनी अनुपालन करावे.
याबाबत कामगारांच्या, कामगार संघटनांच्या तक्रारी असल्यास त्यांनी संबंधित कामगार कार्यालयाशी किंवा उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा संचालनालय, उद्योग भवन यांचेशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असेही त्यांनी कळविले आहे.
***
No comments:
Post a Comment