संचालनालयाच्या नाव व पदनामात बदल
नागपूर, दि.29 : राज्य शासनाच्या 24 एप्रिल 2019 रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार आता वस्त्रोद्योग संचालनालयाच्या नावात बदल करण्यात आला असून, या विभागाला आता वस्त्रोद्योग आयुक्तालय, महाराष्ट्र शासन, नागपूर अशी शासन मान्यता देण्यात आली असल्याचे सहआयुक्त वस्त्रोद्योग यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
तसेच कार्यालयातील अधिका-यांच्या पदनामात संचालक ऐवजी आयुक्त (वस्त्रोद्योग), सहआयुक्त (वस्त्रोद्योग), उप आयुक्त (वस्त्रोद्योग), प्रादेशिक उप आयुक्त (वस्त्रोद्योग), सहाय्यक आयुक्त (वस्त्रोद्योग) आणि सहाय्यक आयुक्त (तांत्रिक) या शब्दांद्वारे बदल करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
याबाबत सर्व संबंधित कार्यालये, आस्थापना यांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, नवीन आयुक्तालयाचा तसा सुधारीत आकृतीबंध इमारतबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला असल्याचेही सहआयुक्त वस्त्रोद्योग यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment