नागपूर,
दि.23 : नेहरु युवा केंद्राचे
वर्षभरातील नियमित कार्यक्रम तसेच समन्वय कार्यक्रमाकरिता जिल्हा सल्लागार समिती युवा कार्यक्रम नेहरु
युवा केंद्र यांची वार्षिक बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृह
येथे उपजिल्हाधिकारी ज्ञानेश भट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी नेहरु युवा केंद्र संघटना, मुंबईचे उपनिदेशक शरद साळुंके, जिल्हा युवा
समन्वयक उदय बीर, मेयो हॉस्पीटलचे डॉ. रवींद्र आत्राम, भारत स्काऊट्स आणि गाईडचे अधिकारी देवेंद्र
आरमल, श्रीमती मंजुषा जाधव, लीड बँकेचे प्रबंधक विजयसिंग न्यास, राष्ट्रीय सेवा
योजनेचे प्रकल्प अधिकारी श्रीमती वर्षा भुजबळ, समाज कल्याण विभागाचे निरिक्षक
प्रवीण मेंढे आदी उपस्थित होते.
जिल्हा सल्लागार समिती युवा कार्यक्रम नेहरु युवा केंद्राच्या वतीने ग्रामीण
भागातील युवकांना सामाजिकतेचे भान जपून त्यांना दिशा दाखविण्यासाठी जागृततापर
कार्यक्रम आयोजित केल्या जातात. उपजिल्हाधिकारी ज्ञानेश भट यांनी युवकांसाठी
वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या प्रबोधनात्मक कार्यक्रमांसाठी मार्गदर्शन केले.
कुपोषण मुक्ती, मतदान जनजागृती तसेच ग्रामीण भागातील आरोग्य समस्यांसाठी
तरुणांच्या वतीने विशेष जनजागृती मोहिम राबविल्यास ती ग्रामीण भागात घराघरात
पोहचेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
युवा मंडळ व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने
तालुका स्तरावर व गाव पातळीवर युवकांच्या
विकासासाठी तसेच प्रबोधनासाठी विशेष कार्यक्रम राबवून त्यांना विविध विषयांचे
प्रशिक्षण दिल्या जाते. यामध्ये मोटर रिवाईंडिंग, संगणक प्रशिक्षण, मोबाईल
दुरुस्ती, विशेषत: महिलांकरिता शिवणकला, हस्तकला आदी विषयांचे तीन महिन्याचे
प्रशिक्षण दिल्या जाते.
*******
No comments:
Post a Comment