Monday, 23 September 2019

नवीन होमगार्ड नोंदणी केलेल्या उमेदवारांची गुणांकन यादी जाहीर


नागपूर दि. 23 :नवीन होमगार्ड नोंदणीच्या कार्यक्रमास हजर असणाऱ्यांची गुणपत्रक यादी जाहीर करण्यात आली आहे. दिनांक 18 ते 20सप्टेंबर 2019 या कालावधीत नवीन होमगार्ड नोंदणीच्या कार्यक्रमास हजर असणाऱ्या उमेदवारांची गुणपत्रक यादी जिल्हा समादेशक, होमगार्ड,नागपूर कार्यालय, काँग्रेस नगर, धंतोली, नागपूर येथे उपलब्ध आहे.तसेच ही गुणांकन यादी http://dnyanjyotisatara.in/hgmaha/login १.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांना गुणपत्रक यादी  25 सप्टेंबरपर्यत पाहता येईल. या यादीमधील गुणांबाबत काही आक्षेप असल्यास लेखी अर्ज जिल्हा होमगार्ड कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन होमगार्ड जिल्हा समादेशक श्रीमती मोनिका राऊत यांनी केले आहे.
*****

No comments:

Post a Comment