नागपूर,दि.25:विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त उपायुक्त संजय धिवरे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त सुधाकर तेलंग, अंकुश केदार, रमेश आडे, तहसिलदार धर्मेंद्र फुसाटे, प्रताप वाघमारे तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयात आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, श्रीमती विजया बनकर, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment