· मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम जमा
नागपूर दि. 20: सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना वस्त्रोद्योग आयुक्तालय कार्यालयातील अधिकारी – कर्मचारी वर्गाने मुख्यमंत्री सहायता कक्षाला एक दिवसाचे वेतन मदतनिधीत जमा केले.
नागपूर वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, तांत्रिक सहआयुक्त शरद जरे, प्रशासन सहआयुक्त संजय कदम आणि इतर अधिकारी व कर्मचारी वर्गाने एक दिवसाचे वेतन मदतनिधीमध्ये जमा केले आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील माता महाकाली महिला मागासवर्गीय सुतगिरणी मर्यादित,खांबेगावच्यावतीने पाच हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता कक्षाकडे जमा केली असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
***
No comments:
Post a Comment