Saturday, 19 October 2019

सतर्कता जागृती सप्ताह येत्या 28 ऑक्टोबर पासून

   
नागपूर, दि. 19: महालेखाकार (लेखा व हकदारी), महाराष्ट्र- दोन यांच्या वतीने सतर्कता जागृती सप्ताह दिनांक 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2019 या कालावधीत "बहुउद्देशीय सभागृह " महालेखाकार कार्यालय-दोन, सिव्हिल लाईन्स, नागपूर  येथे  राबविण्यात येणार आहे.
तसेच पेन्शन पेपर्स तयार करणे, भविष्य निर्वाह निधीच्या अंतिम प्रदानाचे पत्र तयार करणे यासंबंधी शैक्षणिक सत्राचे आयोजन दिनांक 8 नोव्हेंबर 2019 रोजी  सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत  बहुउद्देशीय सभागृह " मुख्य इमारत, महालेखाकार कार्यालय-दोन सिव्हिल लाईन्स, नागपूर  येथे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केले आहे.
सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी आपली नावे  दूरध्वनी क्रमांक 0712-2551192  यावर कळवावीत, असे आवाहन वरिष्ठ लेखाधिकारी एचआरएम-1 महालेखाकार कार्यालय यांनी  कळविले आहे.
सर्व संबधितांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व वेळेवर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहनही महालेखाकार कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
*****

No comments:

Post a Comment