विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019
नागपूर,दि.21 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासनातर्फे 4 हजार 412 मतदान केंद्रांवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.78 टक्के मतदान झाले असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 58 ते 59 टक्के मतदानाचा अंदाज आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे मतदान संपल्यानंतर प्राप्त होणाऱ्या एकूण मतदानाच्या आकडेवाडीनुसार मतदानाची टक्केवारी रात्रौ उशिरापर्यंत प्राप्त होईल.
विधानसभा मतदारसंघनिहाय सायंकाळी उशिरापर्यंत प्राप्त झालेल्या मतदानाच्या एकूण अंदाजानुसार 48 काटोलमध्ये – 64.55, 49 सावनेर – 66.25, 50 हिंगणा – 57.15, 51 उमरेड – 68.03, 52 नागपूर दक्षिण-पश्चिम – 49.51, 53 नागपूर दक्षिण – 48.94, 54 नागपूर पूर्व – 53.18, 55 नागपूर मध्य – 50.13, 56 नागपूर पश्चिम – 48.45, 57 नागपूर उत्तर – 50.71, 58 कामठी – 57.20, 59 रामटेक – 62.69 असे एकूण 12 विधानसभा मतदारसंघात 55.72 टक्के मतदानाचा अंदाज आहे. मतदानाची टक्केवारी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अंतिम झाल्यानंतर मतदानाची टक्केवारी पाठविण्यात येईल. उपरोक्त मतदानाची टक्केवारी मतदान संपण्यापूर्वीची असून अंतिम टक्केवारीत वाढ होणार आहे.
** * * * **
No comments:
Post a Comment