नागपूर, दि. 22 : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नागपूर या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अंतर्भूत असलेल्या नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांनी अनुसूचित जमातीचे जमात प्रमाणपत्र तपासणी करण्याचे प्रस्ताव दिनांक 28 फेब्रुवारी 2020 पर्यंत समितीच्या www.etribevalidity. mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करावे, असे आवाहन समितीचे सहआयुक्त विनोद पाटील यांना केले आहे.
विविध शैक्षणिक संस्थामध्ये सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षामध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी व सर्व प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी संबंधित प्रस्ताव सादर करावे.
शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या तसेच वर नमूद अभ्यासक्रमासाठी इच्छुक असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव संबंधित शैक्षणिक संस्थेने विहित कालमर्यादेत पुरस्कृत करण्याची जबाबदारी संस्थांची आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी देखील त्यांचे जमात प्रमाणपत्र मुदतीत तपासणी होण्याकरिता तसेच प्रवेशापासून वंचित होवू नये यासाठी त्यांचे जमात प्रमाणपत्र तपासणीचे प्रस्ताव शिक्षण घेत असलेल्या शैक्षणिक संस्थेमार्फत विहीत कालावधीत समितीस सादर होईल, याची दक्षता घ्यावी.
ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये अनुसूचित जमातीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्या सर्व संस्था प्रमुखांना व शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी हे अभियान राबविण्यास सहकार्य करावे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रस्तावात कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी दक्षता घ्यावी. अधिक माहितीसाठी समिती कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक 0712-25600031 यावर संपर्क साधावा, असे आवाहन अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती समितीचे सहआयुक्तांनी यांना केले आहे.
No comments:
Post a Comment