Friday, 22 November 2019

जलशक्ती राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई दि. 22 : जल संधारण आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणा-यांना प्रोत्साहन देण्यासाठी दिल्या जाणा-या दुस-या जलशक्ती राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० नाव्हेंबर २०१९ आहे. जल संधारण आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणा-यांना प्रोत्साहन आणि  त्यांच्या कामांना गती देण्यासाठी केंद्र शासनाने गेल्या वर्षीपासून राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर केले आहेत. यंदाचे या पुरस्काराचे दुसरे वर्ष असूनया पुरस्कारासाठी केंद्रशासनाने राज्यातील विविध संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी www.mowr.gov.in किंवा www.cgwb.gov.in यासंकेतस्थळास भेट द्यावी.
०००

No comments:

Post a Comment