Friday, 22 November 2019

जीएसटी प्रॅक्टिशनर्सच्या नावनोंदणीच्या पुष्टीकरणासाठी परीक्षा


मुंबई दि. २१ : राष्ट्रीय सीमा शुल्कअप्रत्यक्ष कर आणि नार्कोटक्स अकादमी (नासेन) यांच्या  २८ मे २०१८ रोजीच्या अधिसुचनेनुसार वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रॅक्टिशनर्सच्या नाव नोंदणीच्या पुष्टीकरणासाठी १२ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ ते १.३० या वेळेत  परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
यासंबंधी केंद्रीय वित्तमंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक निर्गमित केल्यानुसार नियम ८३ (२) च्या अधीन जीएसटी नेटवर्कवर नोंदणीकृत झालेले आणि नियम ८३ (१) (ख) च्या अंतर्गत येणारे जीएसटीपी अर्थात जे सेल्स टॅक्स प्रॅक्टिशनर किंवा टॅक्स रिटर्न प्रिपेयरर म्हणून काम केलेले आणि तत्कालीन कायद्यांतर्गत पाच वर्षांच्या कामाचा अनुभव असेलेले प्रॅक्टिशनर यांना ३१ डिसेंबर २०१९ च्या आत परिक्षा देणे आवश्यक आहे. यापूर्वी यासाठी  दि. ३१ ऑक्टोबर २०१८१७ डिसेंबर २०१८ आणि १४ जून २०१९ रोजी परिक्षांचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रॅक्टिशनरर्ससाठी पुढील परिक्षा १२ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
परिक्षा संगणकावर घेण्यात येईल. यासाठी जीएसटीपीद्वारे नोंदणीकृत पोर्टलवर नोंदणी करता येऊ शकेल. यावर नासेन आणि सी.बी.आय.सी च्या संकेतस्थळाची लिंक देण्यात आली आहे. १२ डिसेंबर २०१९ च्या परिक्षेसाठी नोंदणी व्हावी यासाठी हे पोर्टल २२ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत खुले राहील. परिक्षार्थींच्या मदतीसाठी या काळात एक मदत केंद्रही सुरु करण्यात येईल व त्याची माहिती नोंदणी पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाईल. या परिक्षेसाठी परिक्षार्थीनी ५०० रुपयांची परिक्षा फी ऑनलाईन स्वरूपात भरणे आवश्यक आहे.
जीएसटी कायदा आणि प्रकिया-वेळ २ तास ३० मिनिट, बहुपर्यायी प्रश्न संख्या १००, भाषा इंग्रजी किंवा हिंदी, गुण २००, पात्रता गुण किमान १००, निगेटिव्ह मार्किंग नाही, याप्रमाणे परिक्षेचे स्वरूप तर केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७,एकात्मिक वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७, सर्व राज्यांचे वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७, केंद्र शासित प्रदेशातील वस्तू आणि सेवाकर अधिनियम २०१७, वेळोवेळी निर्गमित केलेल्या अधिसुचनापरिपत्रके आणि आदेश याप्रमाणे अभ्यासक्रम राहणार आहे.
वस्तू आणि सेवा कर प्रणाली ही सातत्याने विकसित होत असलेली प्रणाली आहे. यामुळे या परिक्षेसाठीचा अभ्यासक्रम ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या माहितीवर आधारित असेल.
0000

No comments:

Post a Comment