Friday, 22 November 2019

माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह यांच्याकडून ज्येष्ठ संपादक नीलकंठ खाडिलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई दि. 22 : ‪ज्येष्ठ पत्रकार- संपादक नीलकंठ खाडिलकर यांच्या पार्थिवाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी नवाकाळ कार्यालयात जाऊन अंत्यदर्शन घेतले आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1992 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाचा पहिला लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार त्यांना 2008 साली प्रदान करण्यात आला होता.
यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक सुरेश वांदिले, वरिष्ठ सहाय्यक संचालक सर्वश्री डॉ. सुरेखा मुळे, ज्ञानोबा इगवे उपस्थित होते. त्यांनीही नीलकंठ खाडिलकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि कुटुंबियांचे सांत्वन केले.

०००

No comments:

Post a Comment