Friday, 22 November 2019

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून नीलकंठ खाडीलकर कुटुंबियांचे सांत्वन


मुंबईदि. 22 : अग्रलेखांचा बादशहाज्येष्ठ पत्रकार आणि नवाकाळचे माजी संपादक नीलकंठ खाडीलकर यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खाडीलकर यांच्या गिरगाव येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.
राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी खाडीलकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वनही केले.
यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशीमाजी मंत्री छगन भुजबळदैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊतवैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे  सहसंचालक तात्याराव लहानेमाजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे-पाटीललेखिका विजया वाड यांच्यासह सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी खाडीलकर यांचे अंतिम दर्शन घेतले.



000

No comments:

Post a Comment