नागपूर दि.21 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदन पत्र भरण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.
त्यानुसार माध्यमिक शाळांमार्फत नियमित विद्यार्थ्यांची आवेदन पत्रे सरल डाटाबेसवरुन तसेच पुर्नपरीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदन पत्रे प्रचलित पध्दतीने नियमित शुल्कासह 30 नोव्हेंबरपर्यंत तसेच विलंब शुल्कासह 1 ते 10 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरता येतील. यासाठी www.mahahsscboard.maharashtra. gov.in किंवा www.mahasscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने आवेदन पत्र सादर करावे. माध्यमिक शाळांनी 11 डिसेंबरपर्यंत बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावे. विद्यार्थ्यांची आवेदन पत्रे सरल डाटाबेसवरुन सेव होत नसल्यास All Application च्या लिंकवरुन दिलेल्या मुदतीनुसार भरावीत, असे आवाहन नागपूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment