Thursday, 21 November 2019

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा" येत्या 1 डिसेंबरला


नागपूर,दि.21:"पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा" रविवार, दिनांक 1 डिसेंबर रोजी बी.आ. मुंडले हायस्कूल, दीक्षाभूमी चौक, श्रद्धानंदपेठ नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व बी.आर. मुंडले हायस्कूल, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा रोजगार मेळावा 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 4 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर चे सहायक संचालक प्र. गं. हरडे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींकरिता नामांकित कंपनींमध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मिळणार आहे. या रोजगार मेळाव्यात मोरारजी टेक्सटाइल लि., दिनशॉ डेअरी फुड्स, इंडोरामा सिंथेटिक्स, हल्दीराम फुड्स, सिएट टू-व्हीलर प्लांट, शुअरटेक हॉस्पीटल एण्ड रिसर्च सेंटर, एस. बी. आय. लाईफ इन्शुरन्स तर रेडिसन ब्ल्यु हॉटेल सारख्या 36 हून अधिक नामांकित कंपन्या रोजगार देण्याकरिता सहभागी होणार आहेत. पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने युवक-युवतींनी उपस्थित राहून रोजगाराच्या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन सहाय्यक संचालक प्र.गं.हरडे यांनी केले आहे.
*****

No comments:

Post a Comment