नागपूर, दि. 20 : दिक्षाभूमीच्या विकासासाठी 2018 मध्ये 100 कोटींच्या कामांना तत्वत: मंजुरी दिली असून त्यापैकी रुपये 40 कोटी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले आहेत. हा निधी प्राधिकरणाच्या खात्यावर सुरक्षित आहे. दिक्षाभूमीच्या विकासकामांना आवश्यकतेनुसार पाहिजे तेवढा निधी देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधान परिषदेत दिली.
यासंबंधीची लक्षवेधी सूचना श्री.प्रकाश गजभिये यांनी मांडली.
यावेळी श्री.भुजबळ म्हणाले, प्रधान सचिव, सामाजिक न्याय यांच्या अध्यक्षतेखाली 27 नोव्हेंबर 2019 रोजी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व सबंधित वास्तुशास्त्रज्ञ यांची संयुक्त बैठक घेऊन प्रस्तावित विकास बांधकाम व आराखडा यांचे नियोजन करताना मुख्य स्तुपास बाधा येणार नाही, मुख्य स्तुप दुरुन दिसण्यास अडचण येणार नाही, तसेच मुख्य स्तुपाच्या सौंदर्यास बाधा येणार नाही, याबाबी विचारात घेऊन सुधारित प्रस्ताव तयार करुन तो 15 दिवसात उच्चस्तरीय समितीसमोर सादर करण्याच्या सूचना नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर यांना दिल्या. त्याप्रमाणे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुधारित अंदाजपत्रक प्राप्त करुन घेऊन विभागामार्फत ते उच्चस्तरीय सचिव समितीसमोर सादर करण्यात येणार असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले.
या चर्चेत सदस्य श्री. गिरीष व्यास यांनी सहभाग घेतला.
0 0 0
No comments:
Post a Comment